रायगड जिल्ह्यतील करोनाबाधितांचा आकडा ६१ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात पनवेल तालुक्यात करोनाचे तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत.
कामोठे येथील एका डॉक्टर महिलेला करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले. ही महिला मुंबईतील राजावाडी रुग्णालयात कार्यरत होती. तर कामोठे येथील आणखी एका महिलेला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. ही महिला केईएम रुग्णालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत होती. पनवेलच्या ग्रामिण भागात आणखी एक रुग्ण आढळून आला.
दिलासादायक बातमी जिल्ह्यतील १९ जण करोनामुक्त झाले आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १५ तर ग्रामिण भागातील ४ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यतील ३४ जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
