औरंगाबादमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांना करोना

औरंगाबादमध्ये आणखी तिघांना करोनाची लागण झाली आहे. एकाच कुटुंबातील या तिन्ही महिला असून त्यांच्यावर मिनी घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. सध्या घाटीत २० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

आज सापडलेले हे तिन्ही करोना रुग्ण १८ ते ३१ वयोगटातील असून त्या हिलाल कॉलनीत राहतात. या महिलांच्या संपूर्ण कुटुंबाला क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या शेजाऱ्यांनाही होम क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. या महिलेच्या कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी सुरू करण्यात येत आहे. तसेच या तिन्ही महिला कुणाकुणाच्या संपर्कात आल्या होत्या, त्याची यादी तयार केली जात आहे, असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सध्या मिनी घाटीत एकूण १८ करोनाबाधित रुग्णांवर, तर घाटीत दोन अशा एकूण २० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. आज आणखी तीन नवे रुग्ण सापडल्याने औरंगाबादमधील करोनाबाधितांची संख्या ४५वर गेली आहे. तर मृतांची संख्या ५वर गेली आहे. तर राज्यातील करोनाबाधितांची संख्या ६८२०वर गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *