टीव्हीचा आवाज वाढविला म्हणून पतीवर हल्ला

टीव्हीचा आवाज वाढविल्याच्या क्षुल्लक कारणावरून पत्नीने नातेवाइकांच्या मदतीने पतीवर हल्ला केला. ही घटना मंगळवारी सकाळी महालमधील दसरा रोड भागात घडली.

शेख आरिफ शेख हनिफ (वय ३५) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी परवेश शेख ऊर्फ टिकू कलीम शेख (वय २५), फैजल शेख कलीम शेख (वय २२), कलीम शेख अकबर शेख (वय ५२, सर्व रा. भवानी मंदिरजवळ, पारडी) या तिघांविरुद्ध दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी आरिफ व त्याच्या पत्नीचा टीव्हीच्या आवाजावरून वाद झाला.

आरिफच्या पत्नीने नातेवाइकाच्या मोबाइलवर संपर्क साधून त्यांना घरी बोलाविले. आरिफच्या पत्नीचे नातेवाइक घरी आले. त्यांनी लाथाबुक्क्यांनी आरिफला मारहाण केली. यात आरिफ गंभीररीत्या जखमी झाला. आरिफच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *