एक कोटी रुपयांचे मास्क जप्त

‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्कची मुंबईत साठेबाजी सुरूच असल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारच्या मोठ्या कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी दुसऱ्या दिवशीही कारवाईचा धडाका सुरूच ठेवून अंधेरीच्या सहार गाव येथून एक कोटीचे सुमारे चार लाख मास्क हस्तगत केले. या प्रकरणी साठेबाजी करणाऱ्यांवर सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्गो सर्व्हिस रोडवरील सहार गाव परिसरात शहा वेअर हौसिंग व ट्रान्सपोर्ट गोदाम येथे मास्कचा बेकायदा साठा करून ठेवला असल्याची माहिती विलेपार्ले पोलिसांना मिळाली. पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे, सहायक निरीक्षक शिव भोसले यांच्या पथकाने या गोडाऊनवर छापा टाकला. पोलिसांनी तीन गोदामांमध्ये साठा करून ठेवलेले सुमारे १ कोटींचे ४ लाख मास्क जप्त केले. याआधी गुन्हे शाखा युनिट ९ च्या पथकाने सहार आणि भिवंडी येथून १४ कोटींचे मास्क हस्तगत केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *