मुंबईत कोरोनाचा चौथा बळी

कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोनाचे आतापर्यंत ९बळी गेले आहेत तर राज्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ६९ वर्षीय तिबेटियन शरणार्थीचा मृत्यू झाला. हिमाचलप्रदेशमधील टांडा येथील रुग्णालयात या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आर.डी धीमान यांनी याबाबत माहिती दिली. १५ मार्च रोजी हा व्यक्ती अमेरिकेहून परतला होता. याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याचप्रमाणे आतापर्यंत राज्यात तिघांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात जमावबंदी पाठोपाठ संचारबंदी देखील करण्यात आली आहे. प्रत्येकजण कोरोनाशी दोन हात करण्यासाठी घरात राहणं अत्यंत गरजेचं आहे. असं ओरडून सांगत आहे. आतापर्यंत देशात ४७१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा वाढू नये असं वाटत असेल तर लोकांनी स्वतःच्या रक्षणाकरता घरातच राहणं अत्यंत गरजेचं आहे. राज्यात आंतरजिल्हाबंदी लागू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *