अरेरे…नवजात बाळाला करोनाची लागण

करोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. ब्रिटनमध्ये एका नवजात बाळाला करोनाची लागण झाल्याची खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. या बाळाच्या आईलादेखील करोनाची बाधा झाली आहे. या दोघांवरही उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

ब्रिटनमधील वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, या बाळाला करोनाची लागण गर्भात असताना झाली की जन्मानंतर बाधा झाली याबाबत डॉक्टर तपास करत आहेत. नॉर्थ मिडलेक्स हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या चाचणीत आई व बाळाला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आईला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर, बाळावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *