रोजच्या जेवणात लागणा-या कांद्याचा भाव ६० ते ७० रुपये

रोजच्या जेवणात लागणा-या कांद्याचा भाव  ६० ते ७० रुपये

रोजच्या जेवणात लागणा-या कांद्याचा भाव रोजच्या रोज  वाढत आहे. लासलगाव येथील घाऊक बाजारात कांद्याने ४३ रुपये किलो भाव सोमवारी घेतला. यामुळे किरकोळ बाजारात कांद्यासाठी ६० ते ७० रुपये मोजावे लागत आहेत.

कांद्याचे उत्पादन यंदा घटल्याने त्याच्या भावात मोठया प्रमाणात वाढ झाली. लासलगावच्या बाजारात कांद्याचा भाव एक किलोला ४३ रुपये झाला, अशी माहिती राष्ट्रीय कृषी संशोधन व विकास फाऊंडेशनने दिली. दिल्लीच्या बाजारात ३५०० क्विंटल कांदा सोमवारी दाखल झाला, गेल्या वर्षी याच काळात १० हजार क्विंटल कांदा आला होता.

उत्पादन घटल्याने आणि गोदामातून कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांद्याचे भाव वधारले आहेत. जुलै ते सप्टेंबर दरम्यान कांद्याची मोठी मागणी असतानाही त्याचा पुरवठा होत नसतो. कांद्याचे भाव वधारत असल्याने शेतकरी व व्यापा-यांनी कांद्याचा साठा करून ठेवला आहे. त्यामुळे घाऊक बाजारातही कांदा येण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असे एका व्यापा-याने सांगितले. दरम्यान, २०१३मध्ये कांद्याचे सरासरी भाव ३६.९४ रुपये तर २०१४ कांद्याचा सरासरी भाव १६.१० रुपये होता.

कांदा आयातीसाठी नाफेडच्या पुन्हा निविदा देशातील कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाफेडने परदेशातून १० हजार टन कांदा आयात करण्यासाठी पुन्हा निविदा जारी केल्या आहेत. पाकिस्तान, चीन, इजिप्तने भारताच्या निविदांमध्ये रस दाखवला नाही. त्यामुळे पुन्हा निविदा जारी करण्याची वेळ सरकारवर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *