शेअर बाजारात मोठी पडझड, आतापर्यंत २० लाख कोटींचे नुकसान

शेअर बाजारातला आठवड्याचा आजचा शेवटचा दिवस कोरोना व्हायरस संकटामुळे, भारतीय शेअर बाजारासाठी आणखी एक वाईट दिवस ठरण्याची शक्यता आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील सर्व बाजारांत आज सकाळी मोठ्या घसरणीचे सत्र कायम राहिले आहे. जपान आणि अमेरिकेत घसरण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत २० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जपानची राजधानी टोकियोमधील शेअर बाजार ७ टक्क्यांनी कोसळला. तर अमेरिका आणि युरोपियन बाजारात ऐतिहासिक पडझड झाली. गुरुवारी भारतीय बाजारात विक्रमी पडझडीमुळे गुंतवणूकदारांनी ११लाख कोटी गमावले. या आठवड्यात सोमवारपासून आतापर्यंत गुंतणूकदारांच्या जवळपास २० लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. आजही पुन्हा पडझडीचाच अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेअर बाजारात चिंतेचे वातावरण आहे.

शेअर बाजारातील निर्देशाकांमध्ये ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरस संसर्ग ही साथ असल्याची जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा केली आहे. यानंतर ब्रिटन वगळता इतर सर्व युरोपीय देशांमधून येणाऱ्या पर्यटकांना अमेरिकेत प्रवेशबंदी घातलण्यात आली आहे. यामुळे जागतिक मंदीची शक्यतेची चर्चा या सर्वांचा परिणाम आज जागतिक शेअर बाजारांवर दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *