नंदुरबारमध्ये होळीला गालबोट, बोट उलटल्यानं १३ जण बुडाले

होळीच्या आनंदावर विरजण घालणारी घटना महाराष्ट्र – गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात घडलीय. उच्छल येथे तापी नदीच्या बँक वॉटरमध्ये बोट उलटल्यानं १३ जण बुडाले. यात तिघांचा मृत्यू झाला असून ४ जण बेपत्ता आहेत. तर उर्वरित ६ जणांना वाचवण्यात यश आलंय. अंधार पडल्यानं शोध मोहिमेत अडचणी येत आहेत.

स्थानिक ग्रामस्थ आणि मासेमारी करणाऱ्या लोकांनी ६ जणांचे प्राण वाचवले. होळीची सुट्टी असल्यानं गुजरातच्या उच्छल तालुक्यातील सुंदरपूर येथील परिवार सहलीसाठी उकाई धरणात बोटींग करण्यासाठी गेले होते. त्यांच्यावर काळाने घाला घातला.भिंतखुद गावाजवळ वेगाने वारा आल्याने बोट अनियंत्रित झाल्याने अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेत नवापूर तालुक्यातील दोन जणांचा समोवश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *