दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची बदली

दिल्ली हिंसाचार प्रकरणी पोलिसांना फटकारे लगावणारे दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉलिजीयमने १२ फेब्रुवारीला झालेल्या आपल्या बैठकीत त्यांच्या बदलीची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली केली आहे. राष्ट्रपतींनी न्यायाधीश मुरलीधरन यांना पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहावे असे आदेश दिल्याचे त्या बाबतच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

न्यायाधीश एस. मुरलीधर यांची २९ मे २००६ ला दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. इथल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी आयपीसी कलम ३७७ ला देखील नॉन क्रिमिनल घोषित केले होते. ज्येष्ठतेनुसार न्यायाधीश मुरलीधर हे दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीशांमध्ये तिसऱ्या स्थानी होते. आता बदलीनंतर पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात ते मुख्य न्यायाधीश रविशंकर झा यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *