करोनाचे थैमान; बळी ४९० वर

चीनमध्ये करोना विषाणूने धुमाकूळ घातला असून, करोनाच्या बळींची संख्या ४९० वर पोहोचली असून, करोनागग्रस्त रुग्णांची संख्या २४,३२४ वर पोहोचली आहे. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून ही माहिती बुधवारी देण्यात आली.

चीनच्या ३१ प्रांतांमध्ये मिळून करोनाग्रस्त रुग्णांची संख्या २४,३२४ वर पोहोचली आहे, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली. चीनच्या हुबेई या प्रांतात मंगळवारी करोनाचे ६५ रुग्ण नोंदविण्यात आले; तसेच करोनाचे नवे ३१ रुग्ण नोंदविण्यात आले. दरम्यान, ४३१ करोनाग्रस्त रुग्ण गंभीर असून, २६२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या ८९२ झाली आहे आणि संशयीत रुग्णांची संख्या एक लाख ८५ हजार आहे. संशयीतांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *