जालन्यामध्ये गेल्या आठवड्यात ज्या प्रेमी जोडप्याला मारहाण झाली, त्यांचं लग्न झालं आहे. हे दोघेही बुलडाण्याचे राहणारे होते. जालन्य़ाजवळच्या गोंदेगाव शिवारात गेल्या आठवड्यात या दोघांना गुंडांनी मारहाण केली होती. त्यानंतर याप्रकरणी ९ गुंडांना अटक करण्यात आली होती.
आज या प्रेमी जोडप्याचं लग्न झालं. दोन्ही पक्षाकडच्या मंडळींच्या उपस्थितीत दोघांचं लग्न पार पडलं. अगदी साध्या पद्धतीने आणि मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हे लग्न झालं.
जालनातल्या प्रेमी जोडप्याला मारहाण आणि अत्याचार प्रकरणातल्या चार आरोपींना एक दिवसाची वाढीव पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. याआधी 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
मात्र काही चौकशी बाकी असल्याकारणाने आज पोलीस कस्टडीच्या तिसऱ्या दिवशी दिवाणी न्यायालयाने आणखी एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवल्याचा निर्णय दिला.
