वडील आणि मुलीचं नातं हे जगातील सर्वच नात्यांपेक्षा वेगळं आहे. पण जगातील कोणत्याच बाप-लेकीसोबत घडू नये अशी घटना कल्याणमध्ये राहणाऱ्या बाप-लेकीसोबत घडली आहे. शनिवारी रात्री चालत्या लोकलमध्ये चिमुकल्या मुलीला लघुशंका आली होती. तेव्हा रेल्वे सिग्नल लागल्याचं पाहून वडिलांनी मुलीला खाली उतरवले पण याच दरम्यान समोरून येणाऱ्या लोकलने बाप-लेकीला उडवले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
लोकल रेल्वेच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. अर्शद खान असं ४० वर्षीय वडिलांचे नाव आहे तर मुलीचं नाव आयशा खान असं आहे. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे.
मुलीला लघुशंका आली होती. म्हणून कल्याण-ठाकुर्ली दरम्यान रेल्वेला सिग्नल लागल्यामुळे वडील आणि मुलगी रेल्वेमधून खाली उतरले. तेवढ्यात सीएसएमटी कडे जाणाऱ्या भरधाव रेल्वेच्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
