औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांच्या २ गटांत हाणामारी

औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा जबरदस्त राडा झाला आहे. बाहेरून महाविद्यालय परिसरात आलेले विद्यार्थी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांत ही मारामारी झाली आहे, यात काही राजकीय कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे, यात 3 विद्यार्थी जखमी झाले आहेत, पोलीस कॉलेजमधील या राड्याचा तपास करीत आहे.

स्थानिकांनी हस्तक्षेप केल्यामुळे ही भांडण आटोक्यात आली आहे. या भांडणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये ही भांडण असली तरी भांडणीचं कारण अजून समजू शकलेलं नाही. औरंगाबादेत तंत्र निकेतनमध्ये सायंकाळी हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *