डेक्कन नदीपात्रामध्ये झोपलेल्या एकाच्या डोक्यात अनोळखी व्यक्तीने दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी व्यक्ती भीक्षेकरी असून, त्याच्यावर ससून रुग्णलयात उपचार सुरू आहेत.
जॉन असे जखमी झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. जॉन भिक्षेकरी आहे. डेक्कन परिसरामध्ये तो भिक्षा मागतो. तर रात्री डेक्कन परिसरातील संभाजी पुलाखालील मोकळ्या जागेत झोपतो. बुधवारी रात्री जॉन नेहमीप्रमाणे पुलाखाली झोपला होता. त्या वेळी अनोळखी व्यक्तिंनी त्याच्या डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. डेक्कन पोलिस पुढील तपास करीत आहेत.
