गांजा विक्रीकरणाऱ्यास युवकांना अटक

महाविद्यालयीन युवक-युवतींना गांजाची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने अटक केली. शिवाजीनगर परिसरातून त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडील २०० ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

शौकत बाबुलाल शेख (वय ५२, रा. शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशखिंड रोडवर असलेल्या चित्रपटगृहाजवळील पदपथावर एक व्यक्ती गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक निरीक्षक गणेश पवार, कर्मचारी शंकर पाटील, विशाल शिर्के, दत्तात्रय फुलसुंदर, राकेश खुणवे यांच्या पथकाने सापळा रचून, गांजा विक्री करीत असताना शौकत शेख यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून २०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. शेख पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात यापूर्वी गांजा विक्रीबाबतचे गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *