पावसाळ्याच्या काळात काय घालावं? हा प्रश्न जसा कपड्यांच्या बाबतीत पडतो तसाच तो चप्पल-बुटांच्या बाबतीतही पडतो.
पावसाळ्याच्या काळात जर चप्पल -बुटांची निवड चुकली आणि आपण घालत असलेल्या चप्पल-बुटांची नीट काळजी घेतली नाही तर या निष्काळजीपणाचे परिणाम आपल्या पावलांना आणि टाचांना भोगावे लागतात. पावसाळ्याच्या काळात बोटांमध्ये चिखल्या, टाचांना भेगा हे आजार जंतूसंसर्गाने होतात आणि हा जंतूसंसर्ग प्रामुख्यानं चप्पल-बुटांची नीट काळजी न घेतल्यामुळेही होतात. आणि म्हणूनच पावसाळ्याच्या काळात आपल्या पावलांची काळजी तर घ्यावीच पण चप्पल बुटांची आवजरून काळजी घ्यावी.
1 पावसाळ्याच्या काळात बाहेरून घरी आल्यावर चपला-बुटांना जर चिखल लागलेला असेल तर तो लगेच स्वच्छ करावा. चपल -बुटातलं पाणी ङिारपून जाईल या पध्दतीनं त्यांना ठेवावं.
2 स्पोर्टस शूज जर ओले चिंब झाले असतील तर आधी त्या बुटांची लेस सोडावी. बूट उलटे करून सुकवायला ठेवावेत. शक्यतो टांगून ठेवावेत. स्पोर्टस शूज ओले झाल्यानंतर लगेच सुकवायला ठेवले तरच ते टिकतात. नाहीतर लगेच खराब होतात.
3. पावसाळ्याच्या काळात लेदरचे पादत्रणं वापरू नये. एखाद्या प्रसंगी वापरायचे असतील तर लेदरच्या चपला बुटांना व्ॉक्स बेस पॉलिश लावावं. या पॉलिशच्या थरामुळे पावसाळ्यातील ओलेपणापासून लेदरच्या पादत्रंणांचं सरंक्षण होतं. आणि जर हे पॉलिश करणं जमलं नाही आणि पावसात चप्पल बुट ओले झाले तर सरळ पंख्याखाली ठेवून वाळवावे. आणि बाहेर ऊन पडल्यावर उन्हात वाळ्वावेत. ते जर ओलेच राहिले तर घाण वास येतोच शिवाय महागड लेदर चटकन खराब होतं.
4. पावसाळ्याच्या काळात होता होईल प्लॅस्टिक मटेरिअल असलेले चप्पल बूट वापरावे. यामुळे चप्पल बूट गच्च ओले होवून पावलांना इजा होण्याचेही टळेल.
5 पावसाळ्याच्या काळात स्वच्छ ऊन पडलं की लगेच आपले चप्पल बूट वाळवावेत. ही अगदी प्राथमिक काळजी आहे. ती सहज घेता येईल
6 चप्पल बूट जर ओले असतील तर ते तसेच शू कॅबिनेटमध्ये ठेवू नये. यामुळे चप्पल बूट ओलेच राहून ते खराब होतात. आणि बूटांना आणि कॅबिनेटलाही दरुगधी येते.

