खोड्या केल्याने हॉस्टेल संचालिकेची चिमुरड्याला मारहाण, 2 दिवस बाथरुममध्ये कोंडलं

पब्लिक स्कूलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खोड्या करतो म्हणून सहा वर्षांच्या चिमुरड्याला बेदम मारहाण करुन त्याला बाथरुममध्ये तब्बल दोन दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार घडला आहे. पाचगणीतील आराध्य इंटरनॅशनल या वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या बाबत वसतिगृहाचे संचालक सुप्रिया जाधव आणि मल्हारी जाधव या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कबीर सिंह असे या सहा वर्षांच्या मुलाचं नाव आहे. वसतिगृहात खोड्या करतो या कारणातुन त्याला बेदम मरहाण करण्यात आली. आता नुसती मारहाणच नाही, तर या चिमुकल्याला दोन दिवस चक्क बाथरुम मध्ये डांबूनही ठेवलं. आराध्य या इंटरनॅशनल वसतिगृहातील सुप्रिया जाधव आणि मल्हारी जाधव या दोघांनी या चिमुरड्याला मारहाण करुन त्याला दोन दिवस उपाशी ठेवले.

सुप्रिया जाधव यांनी प्रथम त्या बालकाला मारहण केल्याची कबुली एकदा दिली. मात्र, नंतर मारहाण केलीच नाहीस कोंडून ठेवलंच नाही, असं म्हणत त्या चिमुरड्यावर चोरीचा आरोपही त्यांनी केला आहे.

याप्रकारणी चिमुरड्याची बहीण भितू हिने चेंबूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन सुप्रिया जाधव आणि मल्हारी जाधव या दाम्पत्य चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *