विरारमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सध्या वाढच्या तणावामुळे तरुण मुला- मुलींच्या आत्महत्येचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. अशातच विरार पूर्वेच्या साई संयोग अपार्टमेन्टमध्ये राहणारम्य़ा दिशा राजु चव्हाण या १४ वर्षीय तरुणीने घरातच पंख्याला ओढणी गळफास लाऊन घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार पाच जानेवारीला संध्याकाळच्या सुमारास घडली असून, विरार पोलीस ठाण्यात या आत्महत्येप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, या मुलीला उपचारासाठी विरार पश्चिमेला असलेल्या संजिवनी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी या तरुणीला उपचारांपूर्वीच मृत घोषीत केले.

दिशा राजू चव्हाण असे या आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून विरार पूर्वेच्या साई संयोग आपर्टमेन्टमध्ये जी विंग मधील ती रहिवासी होती.

या प्रकरणी मुलीची आई अश्वीनी राजु चव्हाण यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. रविवार संध्याकाळी ६.३० च्या आधी हा आत्महत्येचा प्रकार घडल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

विरार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एस आर तुगावे आणि सहकारम्य़ांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यानंतर मृत देह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

या प्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी मानसिक तणावातून ही आत्महत्त्या केली असावी अशी माहिती विरार पोलिसांनी दिली. विरार पोलीस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *