रायगड- उरणजवळ तेलाने भरलेले टँकर उलटले, रस्त्यावर तेल पसरल्याने वाहतूक कोंडी

रायगडमधील उरणजवळ तेलाचे दोन टँकर उलटले आहेत. जेएनपीटीकडे जाणाऱ्या मार्गावर हे टँकर उलटले असून रस्त्यावर तेल पसरलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झालं. रस्त्यावर तेल असल्याने वाहतूक कोंडी झाली असून गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर तेल पसरलं असल्याने अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक थांबवण्यात आली आहे. दरम्यान तेल हटवण्यासाठी अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *