सगळीकडे नववर्षाच्या स्वागताचा उत्साह असताना औरंगाबादमध्ये मात्र या उत्साहाला गालबोट लागणारी घटना घडली आहे. कार विहिरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात 2 तरूणांचा मृत्यू झाला असून 3 तरूण मृत्यूशी झुंज देत आहेत.
नववर्षाच्या स्वागताची पार्टी करून परतलेल्या तरूणांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून कार जवळच्या विहिरीत कोसळली. देवगिरी किल्यासमोर घटना घडली आहे.
या घटनेत पाच तरूणांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन तरूण मृत्यूशी लढत आहेत. या तरूणांनी मद्यप्राशन केलं होतं का? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पण या घटनेने पाच कुटुंबांवर आणि जवळच्या मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोकडीया हुनमान कॉलनीत राहणारी ही पाच मुलं होती. देवगिरी किल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरण्य रिसॉर्टमध्ये थर्टीफस्टची पार्टी करायला गेले होते. पार्टी करून रात्री 2 वाजता औरंगाबादला परतण्यासाठी पाचही जण निघाले. देवगिरीच्या पायथ्याशी या रस्त्यावर एकामागोमाग चार गाड्या होत्या. 3 गाड्या पुढे गेल्या मात्र या गाडीच किल्याच्या वळणावर नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. नियंत्रण सुटल्यावर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीचा कढडा मोडून विहिरीत कोसळली.रोकडीया हुनमान कॉलनीत राहणारी ही पाच मुलं होती. देवगिरी किल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरण्य रिसॉर्टमध्ये थर्टीफस्टची पार्टी करायला गेले होते. पार्टी करून रात्री 2 वाजता औरंगाबादला परतण्यासाठी पाचही जण निघाले. देवगिरीच्या पायथ्याशी या रस्त्यावर एकामागोमाग चार गाड्या होत्या. 3 गाड्या पुढे गेल्या मात्र या गाडीच किल्याच्या वळणावर नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. नियंत्रण सुटल्यावर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीचा कढडा मोडून विहिरीत कोसळली.
