‘सिटी स्कॅन’साठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार

उल्हासनगर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये सिटी स्कॅनसाठी आलेल्या एका ३५ वर्षीय महिलेवर टेक्निशियननेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करत टेक्निशियन जिन्स थॉमस याला अटक करण्यात आली आहे.

उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ५ येथील सर्वानंद रुग्णालयामध्ये एका ३५ वर्षीय महिला मंगळवारी सिटी स्कॅन करण्यासाठी आली होती. त्यावेळी आरोपी जिन्स थॉमस याने पीडित महिलेवर बलात्कार केला. या घटनेने भयभीत झालेल्या पीडित महिलेने हिललाइन पोलिस ठाण्यात धाव घेऊन थॉमसविरुध्द तक्रार दाखल केली. त्यानंतर थॉमस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. हिललाइन पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता २७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *