व्यापाऱ्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने लांबवले

नगरहून वाळूंजकडे दुचाकीवरून जात असलेल्या व्यापाऱ्याला रस्त्यात थांबवून त्यांच्या अंगातील सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला अज्ञात दोन व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नगरमधील तपकीर गल्ली येथील व्यापारी मांगीलाल कनकमल गांधी (वय ७०) हे दोन दिवसांपूर्वी सोलापूर रोडने वाळूंज गावाकडे आपल्या दुचाकीवरून जात होते. सोलापूर रोडवरील बंद पडलेला टोलनाका व बडे पेट्रोलपंपाच्या दरम्यान पाठीमागून मोटारसायकलवरून एक जण आला. तर एक जण पायी आला. दोघांनी मांगीलाल यांना रस्त्यात थांबविले. ‘आमच्या गाडीला काय झाले हे पाहा,’ असे दोघेही म्हणाले. त्यावर गांधी थांबले. मात्र, त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ व अंगठी काढून दोघांनीही पोबारा केला. त्यानंतर काही वेळाने भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *