टेनिसस्टार सानिया मिर्झाच्या कुटुंबियांचा आनंद द्विगुणित झाला आहे. सानियाच्या घरात लवकरच सनई-चौघड्यांचे सूर ऐकायला मिळणार आहेत.
एकीकडे सानिया मिर्झाची देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘खेलरत्न’साठी निवड झाली आहे, तर दुसरीकडे तिची लहान बहिण अनाम मिर्झाचा लवकरच निकाह होणार आहे.
अनाम मिर्झा हैदराबादमधील बिझनेसमन अकबर राशिदसोबत लग्न करणार आहे. हैदराबादमध्ये 16 सप्टेंबर रोजी हा विवाहसोहळा पार पडेल.
सानिया मिर्झाच्या छोट्या बहिणीच्या लग्नाच्या तयारी सुरु झाली आहे. अनाम आई आणि मैत्रिणींसोबत मुंबईत शॉपिंग करत असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा, अबू जानी आणि संदीप खोसला हे अनाम मिर्झाच्या लग्नासाठी डिझाईन करणार असल्याची शक्यता आहे.

