हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप असलेल्या राधे माँच्या अडचणीत आता आणखी वाढ

हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप असलेल्या राधे माँच्या अडचणीत आता आणखी वाढ

हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप असलेल्या राधे माँच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. राधे माँची एकेकाळची भक्त डॉली बिंद्राने तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आपल्याला जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला असून यामागे राधे माँ, एम.एम.गुप्ता यांचा हात असल्याचा मला संशय आहे. याप्रकरणी मी तक्रार दाखल केली असून पोलीस याचा तपास करतील असे बिंद्राने सांगितले.

राधे माँ विरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात एका महिलेने हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार रविवारी मुंबई पोलिसांनी राधे माँला बजावले आहेत.

राधे माँ यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर रोज नवनव्या गोष्टींचा खुलासा होत आहे. काही दिवसांपूर्वीच राधे माँचे मिनी स्कर्टमधील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *