पिकाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

अतिवृष्टीमुळे पीक वाया गेल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत असलेल्या तालुक्यातील नेर येथील महेश प्रकाश जयस्वाल (३९) या शेतकऱ्याने घरात गळफास घेतला.

जयस्वाल यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या पत्नीला दिसल्यानंतर त्यांनी आरडा ओरड केली. गावातच राहणारे चुलत भाऊ  प्रविण जयस्वाल आणि इतरांनी महेश जयस्वाल यांचा देह खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. महेश यांनी आपल्या शेतात कापूस आणि बाजरीचे पीक लावले होते. मात्र अधिक पावसामुळे पीक वाया गेले. घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या काळजीमुळे ते उदास होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *