मंदिरातील घंटेला फास घेऊन युवतीचा मृत्यू

जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात एका युवतीचा मृतदेह मंदिरातील घंटेला फास घेतलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. युवतीच्या वाढदिवसालाच हा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे युवतीने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

अकरावीत शिकणारी ही मुलगी तिच्या मैत्रीणीसह तारळी गावातून दुर्गमानवाड या रस्त्यावर असणाऱ्या गजानन मंदिरात गेली होती. त्याठिकाणी त्यांचे पाच ते सहा मित्र देखील होते. मुलीचा वाढदिवस मंदिरातच साजरा करण्यात आला.

केक कापून झाल्यानंतर संबधित मुलीची मैत्रीण तिथून बाहेर पडली..पण संबधित मुलगी तिथेच हेती.एक तासानंतर एका व्यक्तीने संबधित मुलीने मंदिरातील घंटेला गळफास घेवून आत्महत्या केल्याची माहिती तिच्या घरच्यांना दिली.

ही बातमी समजताच नातेवाईक आणि कसबा तारले गावातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही अशी भूमिका घेतली.

त्यामुळे काही काळ रूग्णालयाबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *