बँक ऑफ इंडिया चे कर्ज झाले स्वस्त

बँक ऑफ इंडिया चे कर्ज झाले स्वस्त

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्जाच्या दरात ०.२५ टक्क्यांची कपात करत कर्जदारांना दिलासा दिला आहे.

बँकेने कर्जावरील बेस रेट ०.२५ टक्क्यांनी घटवून हा दर ९.९५ टक्क्यांवर आणला आहे. यापूर्वी कर्जावरील व्याजर १०.२० इतके होते. येत्या चार मेपासून सुधारित दर लागू करण्यात येणार आहेत.

बँकेच्या व्याजदर कपातीच्या निर्णयामुळे गृह, वाहन कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय आणि एचडीएफस या बँकांनी आपल्या कर्जाच्या दरात ०.१५ ते ०.२५ टक्के कपात केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *