नौदलात पहिली महिला वैमानिक

तिन्ही सेनादलांमध्ये महिला अधिकाऱ्यांना अधिक जबाबदारीची पदे देण्याच्या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतानाच, मूळच्या बिहारमधील सब लेफ्टनंट शिवांगी या नौदलातील पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. यासाठीचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून त्या सोमवारी नौदलात दाखल झाल्या. त्या डॉर्निअर या टेहळणी विमानातून भरारी घेणार आहेत.

बुधवारी देशभरात साजरा होत असलेल्या नौदल दिनाच्या दोन दिवस आधीच कोची येथील नौदल तळावर झालेल्या सोहळ्यात त्या नौदलात दाखल झाल्या. नौदलाच्या दक्षिण विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल ए. के. चावला यांच्या हस्ते सब लेफ्टनंट शिवांगी यांना नौदलातील ‘विंग’ प्रदान करण्यात आले. शिवांगी या बिहारमधील मुझफ्फरपूर येथील आहेत. सेनादलातील आणखी एका पुरुषप्रधान विभागात शिवांगी यांच्या रूपाने महिलांनी प्रवेश मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *