प्रेमासाठी वाट्टेल ते! गर्लफ्रेंडसाठी नकली नोटांचा छापखाना थाटला

शेख समराण या औरंगाबादच्या पठ्ठ्याने आपल्या प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी घरच्या घरीच नकली नोटांचा छापखाना सुरु केला. हा मुलगा औरंगाबादेत बीसीएसचं शिक्षण घेतोय. कॉलेजमध्ये त्याचं एका तरुणीशी प्रेम जुळलं.

प्रेयसी रोज काही ना काही मागण्या करायची, पण त्याच्याकडे तर पैसेच नसायचे, मग काय? या बहाद्दरानं यूट्युबच्या माध्यमातून नकली नोटा छापायचं प्रशिक्षण घेतलं आणि घरच्या घरी नोटा छापायचं मशीन टाकलं. त्या नोटांचा वापर करुन तो प्रेयसीला गिफ्ट घ्यायचा. मौजमजा करायला तो पैसा खर्च करायचा.

सुरुवातीला जिथं सीसीटीव्ही नाही किंवा भाजीबाजारात छोट्या-मोठ्या टपर्‍यांवर तो या नोटा द्यायचा आणि त्यातून सुटे पैसे मिळवायचा, रात्रीच्या वेळी तसंच कमी शिकलेल्या लोकांकडं तो त्या नोटा वापरायचा.

प्रेयसीचे लाड पुरवता पुरवता कानून के लंबे हाथ शेख समराणपर्यंत पोहोचले. याप्रकरणी त्याच्या दोन साथीदारांनाही अटक झालीय. प्रेमकैदी व्हायला हरकत नाही, पण गुन्हे करून खरोखरच्या जेलमध्ये मात्र जाऊ नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *