गोवंडी, चेंबूरमध्ये कमी दाबाने पाणी

तुर्भे जलाशयाला जोडणा-या ६०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम बुधवारी रात्री सुरु होणार असून गुरुवार १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे तब्बल १६ तासांचा पाणीब्लॉक चेंबूर, गोवंडी, मानखुर्द आदी भागांत होणार आहे.

बुधवारी रात्रीपासून गुरुवारपर्यंत गोवंडी पूर्व व पश्चिम, महाराष्ट्र नगर, चिता कॅम्प, ट्रॉम्बे, मानखुर्द गाव, पांजरपोळ, मानखुर्द पूर्व व मानखुर्द पश्चिम तसेच चेंबूर डायमंड गार्डन परिसरातील सी. डी. गिडवानी मार्गालगतचा भाग, शीव-पनवेल महामार्गालगतच्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *