देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवडून आलेल्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी कौटुंबिक गाडी नाकारली आहे. महापौर निधीतून गरीबांना अधिकाधिक मदत मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे. गरीब रूग्णांना महापैर निधीतून अधीक मदत उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी शुक्रवारी दिली.
कौटुंबिक गाडीसाठी वाचणारा पैसा महापौर निधिसाठी देण्यात यावा, अशी मागणी आपण पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापौरपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी पत्रकार कक्षाला भेट दिली. महापौर किशोरी पेडणेकरांसोबत त्यांचे वकिक अॅड.सुहास वाडकर देखील उपस्थित होते.
‘महापौर म्हणून प्रोटोकॉलनुसार एक वैयक्तिक गाडी आणि कौटुंबिक गाडी देण्यात येत. पण माझ्या कुटुंबाला गाडीची आवश्यकता नाही. त्यामुळे आपण गाडी घेणार नाही. गाडीसाठी केला जाणारा खर्च इंधन इत्यादी महापौर निधीला दिला जावा.’ असे आवाहन आपण करणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
