उत्तरप्रदेशातील मथुरेत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आजारी असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना निमंत्रित करण्यात आले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचं आयोजन दीनदयाळ उपाध्याय जन्मभूमी स्मारक समितीने केलं आहे. 25 मे रोजी नागला चंद्रभान गावात कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.
अडवाणी या समितीचे सदस्या नसल्याने त्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचं समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाजपेयी आजार आहेत, हे आम्हाला माहित आहे. मात्र वाजपेयी हे दीनदयाळ उपाध्याय जन्मभूमी स्मारक समितीचे पहिले अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे, असे समितीचे सचिव रोशन लाल यांनी इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसमधी प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे.
शिवाय, अडवाणी हे या समितीचे कधीच सदस्य नव्हते, त्यामुळे त्यांना निमंत्रण करण्यात आले नाहीत, असे रोशन लाल यांनी सांगितले.
मोदीही या समितीचे सदस्य नाहीत. मग त्यांना का निमंत्रण देण्यात आले, असे रोशन लाल यांना विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणले, मोदी पक्षाच्या रॅलीसाठी मथुरेत येणार आहेत. त्याचवेळी ते दीनदयाळ उपाध्याय यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करतील आणि समितीच्या सदस्यांशी मुलाखत करतील.