कॅन्सरग्रस्तांसाठी 19 वर्षीय किरण गितेने केले केस दान

लांबसडक केस म्हणजे प्रत्येक मुलीचं प्रेम… आपल्या केसाची निगा राखण्यासाठी मुली वेगवेगळे पर्याय वापरतात. मात्र असं असताना औरंगाबादच्या एका विद्यार्थीनीने आपले केसच दान केले आहेत. 19 वर्षीय किरण गितेने  कँन्सरग्रस्तांना केस दान केले आहेत. पाहूयात किरण गिते नावाच्या या धाडसी तरूणीची ही गोष्ट….

लांबसडक केस हे महिलांसाठी जणू दागिना असतो. महिलांचं त्यांच्या केसांवर खूपच प्रेम असतं. पण सामाजिक बांधिलकीतून किरण गिते नावाच्या तरुणीनं आपल्या लांबसडक केसांचा त्याग केलाय. कॅन्सर झालेल्या महिलांचे केमोथेरेपीमुळे केस गळतात. डोक्यावर टक्कल पडल्यानं महिलांच्या सामाजिक जीवनात वावरण्यावर मर्यादा येतात. किरणनं दान केलेले केसातून अशा महिलांसाठी विग तयार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *