लग्न मंडपातच नवरदेवाची गळफास घेऊन आत्महत्या

आंध्र प्रदेशमधील हैदराबादमध्ये एका तरुणाने लग्नाला काही मिनिटं बाकी असताना लग्न मंडपामध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा नवरी मुलगी आणि तिच्या वडीलांना इतका मोठा धक्का बसला की दोघांनाही उपाचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

मेधचाल जिल्ह्यामधील कोम्पल्ली येथे ही धक्कादायक घटना घडली. एन. एस. संदीप असं मृत तरुणाने नाव आहे. वृत्तानुसार संदीप हा पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर होता. बऱ्याच प्रयत्नानंतर त्याचं लग्न ठरलं होतं. चांगला नोकरी करणारा नवरा मुलगा मिळाल्याने मुलीकडचेही आनंदामध्ये होते. लग्नासाठी दोन्ही कुटुंबांने जोरदार तयारी केली होती. दोन्हीकडील शेकडो पाहुणे लग्नसाठी मंडपामध्ये उपस्थित होती. नवरी मुलगी वधूपक्षासाठी देण्यात आलेल्या रुममध्ये तर नवरा मुलगा वरपक्षाच्या रुममध्ये लग्नासाठी तयार होत होते. लग्न मुहूर्ताच्या काही वेळ आधी मुलगी लग्न मंडपामध्ये येऊन मंचावर उभी राहिली. सर्वजण संदीपची वाट पाहत होते.

लग्न मुहूर्त अगदी जवळ आला तरी संदीप लग्न मडंपामध्ये आला नाही. त्यामुळेच नातेवाईकांनाच शंका येऊ लागली. त्यांनी दरवाजा ठोठावले. पण आतमधून संदीपने काहीच प्रतिसाद दिला नाही. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर रुमचं दार तोडण्यात आलं. आतमधलं दृष्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. संदीपने रुममधील पंख्याला चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. लगेचच संदीपला खाली उतरवून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याला मृत घोषित करण्यात आलं. संदीपने नक्की आत्महत्या का केली याबद्दलची कोणताही माहिती समोर आलेली नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *