शिवसैनिकांकडून विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

पुण्यात शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. कोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास रोजवर इफ्को टोकिओ कंपनीचं कार्यालय आहे. या कार्यालयात कामकाज सुरु होत असताना शिवसैनिक तिथे घुसले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.

शिवसेना आक्रमक 

राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तातडीने मिळावेत या मागणीसाठी हे हिंसक आंदोलन करण्यात आले. यापुर्वी वेळोवेळी निवेदनं देऊनही कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे अशा पद्धतीत आंदोलन करण्यात आल्याचं शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *