ब्लॅकमेल करुन शोषण करणाऱ्या भोंदू बाबाला महिलांचा चोप

कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांना ब्लॅकमेल करून त्यांचं शोषण करणारा भोंदू बाबा आणि त्याच्या मुलाला महिलांनी चांगला चोप दिला. पुण्याच्या नाना पेठेत घडलेली ही घटना आहे. नंदकुमार भागवत आणि त्याचा मुलगा अभिजीत भागवत या दोघांना स्थानिक महिलांनी चांगला चोप दिला.

हे दोघे त्यांच्याकडे समस्या घेऊन आलेल्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायचे. त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी द्यायचे. हे करत असताना त्यांनी एका महिलेला तिचा फ्लॅट आपल्या नावावर करण्याचा तगादा लावला. परिसरातील महिला कार्यकर्त्यांना या गोष्टीची कुणकुण लागली आणि त्यांनी या भोंदू बाबाच्या घरी धडक देत त्याला धडा शिकवला.

या भोंदू बाबा पिता पुत्राला चोप दिल्यानंतर या महिलांनी त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं. रात्री उशिरा त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *