पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या

भिवंडी येथील कोनगाव भागात एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या १४ वर्षीय चुलत भावानेच हा प्रकार केल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी बुधवारी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

कोनगाव भागात पीडित मुलगी राहत होती. दिवाळी असल्याने सोमवारी रात्री ती फटाके वाजवत असताना तिचा चुलत भाऊ फटाके घेण्यासाठी तिला घेऊन गेला. यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने आरडा-ओरड करू नये म्हणून त्याने तिचे तोंडही दाबून ठेवले होते. मात्र, त्यामुळे गुदमरून तिचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री पर्यंत मुलगी घरी आली नसल्याने तिच्या पालकांनी बेपत्ता झाल्याची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात केली होती. दरम्यान, पोलिसांनी शोध घेतला असता या मुलीचा मृतदेह एका निर्जनस्थळी आढळून आला. प्राथमिक तपासात तिच्यावर चुलत भावानेच लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *