भीषण अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू

कर्नाटकात बुधवारी सकाळी एक भीषण अपघात घडला आहे. येथील तुमकुरमधील कोरोटागेरेजवळ प्रवाशांनी भरलेली एक बस उलटली. या अपघातात पाच प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात घडल्यानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत, मदतकार्य सुरू केले होते. तर, अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

यावर्षी जुलै महिन्यात कर्नाटकातील चिंतामणी येथे देखील भीषण अपघात झाला होता. यामध्ये १२ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर २० पेक्षा अधिकजणांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *