लातूर शहरात कमी पावसामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून लातूर शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. काल रात्रीच्या सुमारास लातूर शहरात १५ ते २० मिनिटे मुसळधार पावसाने हजेरी लावली.या जोरदार पावसामुळे औसा रोड भागातून पाणी रस्त्याने वाहत होते. दोन दिवसांपूर्वीही असाच जोरदार पाऊस लातूर आणि जिल्ह्याच्या काही भागात झाला होता. ज्यामुळे समाधान व्यक्त केलं जातं होतं. त्यातच काल रात्रीच्या या मुसळधार पावसामुळे आनंद व्यक्त केला जात आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील पावसाची सरासरी ही जवळपास ५०० मिमी पर्यंत गेली आहे. तर सर्वाधिक कमी पाऊस पडलेल्या लातूर तालुक्याची सरासरी ही ३०० मिमी च्या पुढे सरकली असून ती जवळपास ३५० मिमी इतकी झाली आहे.
या पावसामुळे लातूरच्या पाणी पातळीत काही अंशी वाढ होण्याची आशा लातूरकरांना आहे. दरम्यान असाच पाऊस पुढील काही दिवस मांजरा धरण क्षेत्रात पडावा, जेणे करून लातूरकरांवरील तीव्र पाणी टंचाईचे ढग दूर होतील. तशी अपेक्षाही सर्वसामान्य लातूरकर व्यक्त करीत आहे.
