तांत्रिक बिघाडामुळे वाशी नाका परिसरात मोनोरेल बंद पडल्याने मोनोरेलची वाहतूक ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलला होणारा विद्युत पुरवठा बंद झाल्यानंतर ही वाहतूक ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे.वाशी नाका परिसरात मोनोरेल मध्येच बंद झाल्याने मोनोरेलमधील सर्व प्रवासी अडकून पडले. मात्र मोनोरेल बंद पडण्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोनोरेलच्या डब्यांना शिडी लावून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
