सांगलीत मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आटपाडी तालुक्यातील हिवतड येथे ही घटना घडली. लांडग्यांच्या हल्ल्यात २५ मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या असून पाच मेंढ्या जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेतात बसवल्या गेलेल्या मेंढ्यांच्या कळपावर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास लांडग्यांच्या कळपाने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मेंढ्यांना बचाव करण्याची संधी मिळाली नाही. सतीश तातोबा शेळके (रा. कन्हरेवाडी, ता .करवीर जिल्हा कोल्हापूर) यांच्या मालकीच्या या मेंढ्या होत्या. यामुळे त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे.
