महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांनी कुडाळ तालुक्यातील घावनळे गावातून गाव भेटीला सुरुवात केली आणि ग्रामस्थांची गार्हाणी ऐकून घेतली घावनळे गावांमध्ये कोणतेही विकास काम झालेले नाही फक्त फसवणुकीची आश्वासने दिली अशी खंत ग्रामस्थांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासमोर व्यक्त केली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी घावनळे गावांमध्ये ग्रामस्थांची भेट घेतली या गाव भेटीमध्ये ग्रामस्थांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यात आली घावनळे गावांमध्ये चांगले रस्ते नाहीत, वाहतूक करायला पुल नाही. या गावांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून फसवणुकीची आश्वासने दिली जातात. अशी व्यथा ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले की, माझ्या खासदार फंडातून गावातील जी आवश्यक कामे आहेत. ती मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन फक्त तुमचा पाठपुरावा असला पाहिजे असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत , जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, पक्षाचे उपाध्यक्ष अशोक सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष विनायक राणे, युवक सरचिटणीस विशाल परब, महिला जिल्हाध्यक्ष सौ. संध्या तेरसे, बँक संचालक प्रकाश मोर्ये, माजी सौ. प्रतिभा घावनळकर, अध्यक्ष रेखा काणेकर, नगरसेवक सुनील बांदेकर, सौ. रेवती राणे, विभागीय अध्यक्ष राजा धुरी, श्रीपाद तवटे तसेच सचिन घावनळकर, शंकर म्हैसकर, आनंद लाड, यशवंत सावंत, महादेव पालव, अमित सावंत, हनुमंत नाईक, स्वप्नील सावंत, प्रविण सावंत, रघुनाथ म्हैसकर, मधुकर भोई, अजित भोई, मनोहर कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
