पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळीत बोनस

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सुमारे १० हजार २०० कर्मचाऱ्यांना दिवाळीत बोनस देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. संचालक मंडळांच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी महापालिका आर्थिक तरतूद करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘पीएमपी’ कर्मचाऱ्यांसाठी गणेशोत्सव हा आनंददायी ठरला असून, पीएमपी संचालक मंडळाने त्यासाठी वेळीच तरतूद केली आहे. महापालिकेतील पत्रकार परिषेदत महापौर टिळक यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे उपस्थित होते. ‘पीएमपी’कडून दर वर्षी कर्मचाऱ्यांना दिवाळीत सानुग्रह अनुदान (बोनस) दिले जाते. महापालिकेकडून ‘पीएमपी’ला देण्यात येणाऱ्या रकमेतून सानुग्रह अनुदानाची रक्कम अदा करण्यात येते. यंदा विधानसभेच्या निवडणुका ऐन दिवाळीत आल्याने आचारसंहितेत हे बक्षीस; तसेच सानुग्रह अनुदान देण्यात अडचण येण्याची शक्यता होती. त्यामुळे वेळीच निर्णय घेऊन, कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला असल्याचे महापौरांनी सांगितले.

आचारसंहितेपूर्वीच यासाठीच्या आवश्यक मान्यता घेण्यात येतील. ही रक्कम देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष कांबळे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *