डोकेदुखीवरील गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू

दीर्घ काळापासून असलेली डोकेदुखी बरी करण्यासाठी दिलेल्या औषधाच्या गोळ्यांचा अतिडोस घेतल्यामुळे एका महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. अनुसूयाम्मा (४५) असे मृत स्त्रीचे नाव असून तिने शनिवारी डोकेदुखी बरी करणाऱ्या औषधाच्या १५ गोळ्या एकदम घेतल्या होत्या.

शनिवारी अनसूयाम्माने हा अतिडोस घेतल्यानंतर त्यांची शुद्ध हरपली. त्यांच्या मुलीने तातडीने अनुसयाम्मांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना व्हिक्टोरिया रुग्णालयात भरती करण्यात आले. दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. तिच्या पतीने पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार अनेकल पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *