इंटरसिटी एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड; म.रे. विलंबाने

इंटरसिटी एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत आहेत. डोंबिवली आणि कोपर स्थानकामध्ये ही एक्सप्रेस बिघडल्याने यादरम्यानच्या फास्ट लोकल धीम्या मार्गावर वळवल्या.

आज मंगळवार  आठवड्याच्या   दिवशी सकाळीच कार्यालये गाठण्याच्या वेळेत नेमकी ही घटना घडल्याने प्रवाशांचे काहीसे हाल झाले. मात्र आज मोहरमनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने गर्दी काहीशी कमी होती.

डोंबिवली आणि कोपर स्थानकादरम्यान जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवल्याने सर्वच लोकलचा खोळंबा झाला. परिणामी अप आणि डाऊन मार्गावर गाड्या १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *