अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या घरी बाराव्या मजल्यावर साप

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या घरी बाराव्या मजल्यावर साप

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या सांताक्रुजच्या घरी बाराव्या मजल्यावर साप सापडला आहे. हा साप बिनविषारी असल्याचं सांगण्यात येतंय, हा कॉमन वुल्फ स्नेक आहे.  हा साप बाराव्या मजल्यावर कसा पोहोचला हे खरं कोडं आहे.

हा साप ताब्यात घेण्यासाठी शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे, सर्प मित्र मुरलीधर जाधव यांना बोलवण्यात आले होते. रात्र पाळी करुन घरी जात असताना जाधव याना आला कॉल , तातडीने त्यांना घटनास्थळी जावे लागले.

हा साप घारी कडून निसटला असावा, आणि या घरात हा साप पाच, सहा दिवसांपासून मुक्कामाला असावा, असा अंदाज मुरलीधर जाधव यांचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *