धुळ्यात एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
धुळ्यातील शिरपुरजवळ एका केमिकल कंपनीत शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाला. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या स्फोटामुळे आसपासचा परिसरही हादरला असून नागरिकांमध्येही भितीचं वातावरण पसरलं आहे. अद्यापही आग धुमसत असून परिसरात आगीचे लोट पसरले आहेत. दरम्यान, या ठिकाणी काही लोक अडकल्याची भितीही वर्तवण्यात येत आहे.
अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून मृतांचा आकडाही वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हा स्फोट कशामुळे लागला याची माहिती अद्याप समोर आली नाही. स्फोटाची तीव्रता इतकी अधिक होती की आसपासच्या घरांनाही तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता लोकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी झाले आहेत. सर्व यंत्रणांना तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी दिली.
