पोलिस अधिकारी ममतांच्या पाया पडला!

पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ पोलिस अधिकारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाया पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ममता यांनी पोलिस अधिकारी राजीव मिश्रा यांना केक भरवला. त्यानंतर मिश्रा हे ममता यांच्या पाया पडण्यासाठी पुढे झुकल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

ममता बॅनर्जी यांनी या वेळी तेथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका अधिकाऱ्यालाही केक भरवला. कोलकात्यापासून २०० किमी अंतरावर असलेल्या दिघा येथे गेल्या आठवड्यात ममतांनी भेट दिली होती. हा व्हिडिओ त्या वेळचा असल्याचे मानले जाते. दिघा येथील समुद्रकिनारी एका भिंतीवर ममता बॅनर्जी बसल्याचे दिसते. भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला असून, ‘ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?,’ सवाल त्यांनी या ट्विटसोबत केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *