पत्नीच्या यातना सहन झाल्या नाहीत; पतीनं तिच्यासह स्वत:लाही संपवलं!

पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केल्याची घटना रावेत येथे आज सकाळी उघडकीस आली. वृक्षाली लाटे (वय ४०) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तर, गणेश ऊर्फ संजू चंद्रकांत लाटे (४५) असं आत्महत्या करणाऱ्या इसमाचं नाव आहे.

 रावेतमधील शिंदे वस्तीतील आदित्य टेरेस इमारतीत ते राहत होते. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास गणेश यानं हातोडी डोक्यात मारून पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून वृषाली आजारी होती. आजारपणात तिला होणाऱ्या यातना सहन न झाल्यानं गणेशनं तिचा खून करून स्वत:लाही संपवले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यानं हे सगळं नमूद केलं आहे, अशी प्राथमिक माहिती देहूरोड पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *